अतिक्रमण जमीन विकण्यास नकार दिल्याने रोझवा पुनर्वसन येथे दोघांवर चाकू हल्ला
तळोदा
तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे फिर्यादीच्या वडिलांनी अतिक्रमण जमीन विकण्यास नकार दिल्याने आरोपीने दोघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,जिल्हा परिषद शाळा, रोझवा येथे दिनांक 9 रोजी सकाळी 7:30 वाजता खेमसिंग टुक्या पावरा मजुरांची वाट पाहत उभा असताना किसन धुरक्या पावरा रा. रोझवा पुनर्वसन याने अचानक येऊन काहीएक न सांगता त्याने त्याच्या खिशातून चाकु काढून खेमसिंग पावरा याच्या डाव्या बरगळी वर वार केला.खेमसिंग यास सोडविण्यासाठी बुवटीबाई टुक्या पावरा आली असता तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार करुन दुखापत केले.म्हणुन तळोदा पोलीस ठाण्यात खेमसिंग टुक्या पावरा रा. रोझवा याच्या फिर्यादीवरुन आरोपी किसन धुरक्या पावरा रा.रोझवा पुनर्वसन याच्याविरोधात 296/2024 भा. न्या.सं.कलम 118 (1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार राजधर जगदाळे करीत आहेत.