जन्म – मृत्यूचे दाखले तीन महिन्यानंतरही मिळेना,बिरसा आर्मीचे तहसीलदारांना निवेदन
नागरिकांचा मनस्ताप
तळोदा
तालुक्यात जन्म-मृत्यूची दाखले ठराविक कार्यपद्धती निश्चित करून दाखले मिळावीत;यासाठी बिरसा आर्मीने तहसीलदार तळोदा यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात जन्म मृत्यू नोंदणीच्या बाबतीमध्ये ज्या लोकांची जुनी नोंद ग्रामपंचायत मध्ये आढळून येत नाही किंवा नोंद केलेली नाही;अशा नोंदी कोर्टातून नोंदणीचे मागणी करून आदेश मिळाल्यावर ग्रामपंचायतीकडून करण्यात येत होती.परंतु,२०२३ च्या राजपत्रानुसार तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून नोंदणी नसल्यावर तहसीलदार त्याची सुनावणी ठेवून आदेश करतात.सदर प्रकरणात सुनावणीसाठी तीन महिन्याहून जास्त कालावधी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.जन्म-मृत्यूची दाखले इतर कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक असल्याने परिसरातील नागरिकांना शैक्षणिक व इतर कामांसाठी मुकावे लागत आहे.जन्म-मृत्यूच्या दाखला काढण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.काही त्रुटी असल्यास पूर्तता झालीच पाहिजे.परंतु,मुद्दाम तीन महिन्यापर्यत वारंवार चकरा मारून त्रास देणे चुकीचे आहे.सदर प्रकरणावर गांभीर्याने विचार करून ठराविक कार्यपद्धती निश्चित करून परिसरातील नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखले लवकर देण्याची व्यवस्था करावी.निवेदनावर बिरसा आर्मीचे जिल्हा सचिव सतीश पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,रापापूर-पाल्हाबार सल्लागार गणेश पाडवी,अमरसिंग वळवी, इरमा वळवी यांच्या सह्या आहेत.