मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मदतीसाठी तळोद्यातील समाजकार्य महाविद्यालयाचा पुढाकार
तळोदा
महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजा करून खास महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आणि या योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी हे अर्ज करण्यासाठी पुढे आले.परंतु मोठ्या प्रमाणात एजंटा कडून आर्थिक लूट सेतू केंद्राने अर्ज भरण्यास दिलेला नकार, त्यामध्येच महसूल विभागाकडून बेमुदत संप आहे. यामुळे योजना आणि योजनेत समावेश होण्यासाठी अर्ज भरताना बरीच दमछाक होत होती. यात समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे दत्तक असलेले गाव ढवळीविहिर येथे समाजकार्य महाविद्यालयाने मागील दोन दिवसांमध्ये जवळपास शंभर महिलांच्या घरी जाऊन त्यांचे कागदपत्र गोळा केली. त्यांना अर्ज भरून दिला. त्याचबरोबर ऑनलाईन त्यांचे अर्ज भरून दिले. दरम्यान गावात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा म्हणून सदर योजनेविषयी पथनाट्य केले.घरोघरी जाऊन योजनेची कागदपत्रांची माहिती दिली. काही महिलांकडे कागदपत्र उपलब्ध होते.परंतु कागदपत्रांचे झेरॉक्स नव्हते.अशा लोकांचे झेरॉक्स करून आणणे.तसेच काही कागदपत्रांची समस्या असेल तर ती समस्या दूर करणे. इत्यादी कार्य समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पुनम पाटिल, पूजाबेन चौधरी, सरला महिरे, अमोल भोई आदी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य उषा भीमसिंग वसावे व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा रामचंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. यासाठी गावातून लोकनियुक्त सरपंच सपनाताई वसावे, दारासिंग वसावे, मुकेश कापुरे आदी यांचे सहकार्य मिळाले.