नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील होमगार्ड भरतीसाठ 26 जुलै पासुन अर्ज मागविण्यास सुरुवात

नंदुरबार जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या जागा भरण्याकरता होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन केलेले आहे. याकरिता दिनांक 26/07/2024 पासून ते दिनांक 14/08/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती https://maharastracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तसेच सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता मैदानी चाचणीचे दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा (तळोदा पथक अंतर्गत धडगाव ), अक्कलकुवा व नवापूर (नवापूर महिला वगळून )या पथकातील पुरुष/महिला होमगार्ड ची नवीन सदस्य नोंदणी असून नोंदणीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे. पथकातील पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवासी पुरावा म्हणून मतदान कार्ड /आधार कार्ड शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण, वय 20 ते 50 वर्षे, उंची पुरुषाकरिता 162 से. मी. व महिलांकरिता 150 से. मी. पुरुषांकरिता छाती न फुगविता 76 से. मी. कमीत कमी 5 से. मी. फुगवणे आवश्यक तसेच संबंधित पुरुष/महिला उमेदवारास विहित वेळेत धावणे व गोळाफेक शारीरिक चाचणी द्यावी लागेल.
उमेदवार हे इतर कार्यालयात वेतनी सेवेत किंवा खाजगी सेवेत काम करत असल्यास कार्यालया प्रमुखाचे किंवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक, माजी सैनिक अथवा एनसीसी बी व सी प्रमाणपत्र धारक व इतर अन्य तपशीलाच्या पृष्ठ्यर्थ सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवारास नोंदणीचेवेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल तसेच कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.
तरी होमगार्ड मध्ये सेवा करू इच्छित असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा असे आवाहन जिल्हा समादेशक,होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक,नंदुरबार श्री निलेश तांबे, भा.पो.से. यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button