नंदुरबार शरद पवार राष्ट्रवादी गटाने घेतली जरांगे पाटील यांची भेट
लवकरच उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे दिले संकेत
तळोदा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर १ महिन्यासाठी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मात्र उपोषण काळात प्रकृती बिघडल्याने मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. नंदुरबार शरद पवार राष्ट्रवादी गटाने अंतरवाली सराटी येथे त्यांची भेट घेवून प्रकृतीची विचारणा करत आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे.
जरांगे पाटलांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी हा लढा उभारला आहे. या आंदोलनाची सुरुवात करताना त्यांना असंख्य अडचणीला सामोरे जावे लागले, समाज जुळत गेला अन् क्रांती घडली, जीवाची पर्वा न करत क्रांतिकारक असलेल्या या आंदोलनात सरकार वेळोवेळी गुगली टाकून एक अर्थी पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकार किती काळ या मागण्यांचं घोंगडं भिजत ठेवणार आहे.या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे. अशी चर्चा यावेळी झाली.मराठा आरक्षणाचा लढा कायम ठेवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करणार असून लवकरच उत्तरं महाराष्ट्रात दौरा करणार असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.या प्रसंगी जिल्हा युवा अध्यक्ष संदीप परदेशी, शहर अध्यक्ष योगेश मराठे, कृ.उ.बा. समितीचे उपाध्यक्ष हितेंद्र क्षत्रिय, प्रदेश यू.सचिव ॲड.दानिश खान, शहादा ता.अध्यक्ष चंद्रकांत पाटील,शहादा शहर अध्यक्ष एन. डी.पाटील, आदीजन उपस्थित होते.