नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील शर्वरी माळी व माही पिंपरे शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी भागातून जिल्ह्यात अनुक्रमे प्रथम व व्दितीय
तळोदा :- शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थिनी कुमारी शर्वरी संकेत माळी ही जिल्ह्यात प्रथम तर कुमारी माही लवकुमार पिंपरे ही विद्यार्थिनी जिल्ह्यातून द्वितीय आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नेमसुशिल विद्यामंदिरातील सोळा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात आठ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादन केले अनुक्रमे शहरी भागातून शर्वरी संकेत माळी,माही लवकुमार पिंपरे,लावण्या दिनेश मराठे, पार्थ माधव सोनटक्के, मनस्वी अरूणसिंह कुवर,सौजन्या उमेश राणे ,अनुश्री शैलेश मगरे,हर्मित आनंद मगरे या विद्यार्थांनी यश संपादित केले त्यांना वर्गशिक्षक अरुण कुवर कमलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले सर्व जिल्हा व तालुकास्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल संस्था समनव्यक हर्षिल तुरखीया मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल मुख्या.गणेश बेलेकर सागर मराठे अश्विनी भोपे प्रतिभा गुरव निलिमा वसावे लिपिक नितीन भामरे शैलेंद्र पाटील समाधान मराठे अविनाश पाडवी पोपटसिंगआदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.