देश
नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान
नेपाळमध्ये त्रिभुवन विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाल्याची घटना घडली आहे.
विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. बचावकार्य सुरू आहे. मात्र यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. यामुळे धुराचे लोट हवेत पसरले होते.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाने त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केले. टेक ऑफ करत असताना विमान अनियंत्रित झाले. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आलीय.