Uncategorized
नेर येथील आधार केंद्र त्वरित सुरु करा,माजी सरपंच शंकरराव खलाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नागरिकांची गैरसोय
नेर
सध्या राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुरू असून त्यात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना तसेच संजय गांधी योजना , विश्वकर्मा योजना इतर योजनांसाठी आधार अपडेट आवश्यक असून म्हणून अनेक महिला व इतर लाभार्थी अपडेट करण्यासाठी धुळे, कुसुंबा व साक्री येथे जावे लागते. नेर येथे दोन आधार केंद्र मंजूर असताना ते बंद अवस्थेत आहेत. ते त्वरित सुरू करा अन्यथा दुसऱ्यांना द्या व नागरिकांची गैरसोय टाळा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सेतू अधिकारी श्री विजय पाटील यांच्याकडे करताना नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.शंकरराव खलाणे तसेच माजी कृषी सभापती संग्राम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे यांनी केली.
परिवर्तन 24 न्यूज
धुळे तालुका प्रतिनिधी
संकेत बागरेचा नेर