NTA मधील भ्रष्ट आधिकारी व केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडो मार आंदोलन
NEET परीक्षेतील घोटाळ्याची SIT चौकशी करा : हरीष माळी, युवासेना जिल्हाप्रमुख धुळे
धुळे
NTA(National Test Agency) मार्फत झालेल्या NEET UG 2024 परीक्षेत पेपर फुटला असल्याची जाहीर कबुली केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.मात्र दोषींविरुध्द केवळ दिखावू स्वरुपाची कारवाई करून, NEET UG 2024 परीक्षेत सहभाग घेतलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांवर NTA व केंद्र शासन अन्याय करीत आहे.
देशातील अंत्यत महत्वाच्या व कठीण परीक्षेत गौडबंगाल यानिमित्ताने बाहेर आला आहे. यात सत्ताधारी भाजपशी संबंधीत असलेले लोक घोटाळ्यात असण्याची दाट शक्यता आहे. केवळ त्यामुळेच केंद्र शासना कडून अद्याप कोणत्याही स्वरुपाची ठोस अथवा प्रकरणाच्या गांभीर्य पाहून कारवाई झालेली नाही.केंद्र शासन याप्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे का?असा प्रश्न धुळ्यातील युवासेनेने केला आहे.
NEET परीक्षेत केवळ लाखो-करोडो विद्यार्थांचे भविष्यच ठरत नसून हा संपुर्ण देशाच्या नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत व महत्वाचा आहे. NTA व केंद्र शासन यांना याचे गांभीर्य दिसत नाही. NTA च्या विश्वासाहर्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. कोचिंग क्लासेस व पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आल्याने शिक्षणाचे झालेले बाजारीकरण व भांडवलिकरण भारतीय शिक्षण व्यवस्थेस किड लावणारे आहे.आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागसलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केंद्र शासनाकडून केला जात आहे.तसेच या लाजिरवाण्या घटनेमुळे देशातील करोडो विद्यार्थांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास राहावा यासाठी या घटनेची तात्काळ एसआयटी चौकशी करण्यात यावी. तसेच या घटनेस जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी तात्काळ मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. NEET UG 2024 परीक्षेत सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवा यासाठी सदर परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. शिक्षणाचे बाजारीकरण व भांडवलिकरण करणाऱ्या कोचिंग क्लासेस वर तात्काळ बंदी आणण्यात यावी. या लाजिरवाण्या घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफि मागावी.असेही धुळे युवासेना (उबाठा)जिल्हाध्यक्ष हरिष माळी यांनी आंदोलनात मागणी केली आहे.तसेच या घटनेचा निषेध म्हणून धुळे जिल्हा युवासेनेने NTA मधील भ्रष्ट आधिकारी व सदर घटनेस जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे-मार आंदोलन करण्यात आले. यावेळी वैद्यकिय क्षेत्रात करीअर करण्यासाठी शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीने तसेच युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरचे आंदोलन युवासेना धुळे जिल्हा विस्तारक शंभू बागुल यांच्या मार्गदर्शनाने धुळे जिल्हाप्रमुख हरीष माळी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
युवासेना जिल्हाप्रमुख हरिष माळी, युवतीसेना विस्तारक सोनी सोनार,समन्वयक मोहित वाघ,जिल्हा प्रशिद्दी अधिकारी सिद्देश नाशिकर,मंजू पाटील,महानगर संघटक जयेश फुलपगारे, विधानसभा संघटक तरबेज शेख,महानगर प्रसिद्धी प्रमुख शुभम फुलपगारे,झाकीर शेख, सुमित तमखाने,रोहित वाघ, कृष्णा फुलपगारे, श्रवण शिरसाठ आदी युवासेना पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
📡📹परिवर्तन 24 न्यूज 📹📡
धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर