सापाने चावा घेताच तरुणाने घेतला बदला; रागाच्या भरात सापालाच चावला,नेमकं घडलं काय?
सापानं चावल्यामुळे एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. साप माणसाला चावल्यानंतर सापाच्या विषामुळे माणसाचा मृत्यू होतो. पण माणूस चावल्यामुळे सापाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? बिहारमध्ये अशी एक अजब घटना घडली आहे. माणसानं चावल्यामुळे चक्क सापाचा मृत्यू झाला आहे.
एका रेल्वे कर्मचाऱ्याला साप चावला आणि या गोष्टीचा बदला घेण्यासाठी तो रेल्वे कर्माचारी देखील सापाला चावला. एकदा नाही तर तब्बल दोन वेळा या रेल्वे कर्मचाऱ्यानं सापाचा चावा घेतला. या अजब घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याचा नाही तर चक्क सापाचा मृत्यू झाला आहे. आपण या गोष्टीचा कधी विचार देखील केला नसेल. जो साप चावल्यानं माणसाचा मृत्यू होतो, आता त्याच सापाला माणसानं चावलं आणि चक्क सापाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सर्पदंशानंतरही माणूस जिवंत राहिला आणि माणसानं चावल्यामुळं सापाचा मृत्यू झाला आहे.
संतोष लोहार (वय ३५) असं या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संतोष झारखंड लातेहार जिल्ह्यातील पांडूका येथील रहिवासी आहे. तो बिहारमधील रजौलीच्या घनदाट जंगलात रेल्वे रुळ टाकण्याचं काम करतो. संतोष मंगळवारी रात्री काम आटोपून घरी आला. झोपायला जात असताना त्याला सापानं दंश केल्याचे लक्षात आलं. यानंतर संतोषने त्या सापाला हातात पकडलं. बदला घेण्यासाठी संतोष पुन्हा त्या सापाला चावला. एकदा नाही तर तब्बल दोनवेळा संतोष त्या सापाला चावला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत सापाचा मृत्यू झाला आणि संतोषला काहीही झालं नाही. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी संतोषला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोषवर उपचार करण्यात आले आणि त्याची प्रकृती आता स्थिर आहे. भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. पण माणसानं चावल्यामुळे सापाचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना असावी. काही वर्षांपूर्वी ओदिशातल्या जाजपूर जिल्ह्यात एका व्यक्तीला सापानं दंश केल्याची घटना घडली होती. त्याचा बदला घेण्यासाठी संबंधित व्यक्ती पुन्हा सापाला चावला. या घटनेत देखील सापाचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे सर्पदंशानंतरही संबंधित माणूस जिवंत राहिला.