शिंदखेडा
तालुक्यातील विरदेल येथे आषाढी एकादशीनिमित्त श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
दरवर्षी वाढत असलेले तापमान लक्षात घेता वृक्ष लागवड करुन वसुंधरेचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. निसर्ग संवर्धन काळाची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा, एक मुलं एक झाड अशी जनजागृती करत शाळकरी विद्यार्थ्यांच्या रॅली निघताना आपण दरवर्षी पाहतो. त्याअनुषंगाने शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर माध्यमिक विद्यालयाने पुढाकार घेऊन आषाढी एकादशीचे औचित्य सादत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक जे एस पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालय व परिसरात 170 झाडे लावण्यात आले.यावेळी लावलेल्या झाडांच्या रोपांची योग्य वाढ करुन संगोपणाची जबाबदारी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली.वृक्षारोपण प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस एस गोसावी, मॉडेल अधिकारी एन एम पाटील,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.