समाजकार्य महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
तळोदा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील समाजकार्य महाविद्यालयात एम. एस. डब्लू. प्रथम वर्षाची केंद्रीय पद्धतीने सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेस विद्यापीठकडून मुदतवाढ देण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालय स्वीकृती केंद्रात अर्ज जमा करता येतील.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नीत समाजकार्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 करीताची प्रथम वर्ष एम. एस. डब्लू. प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी पद्धतीने सुरु असून विद्यापीठा कडून सदर प्रवेशाची मुदतीत 16 जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठ संलग्नीत नंदुरबार जिल्यातील महात्मा फुले एम. एस. डब्लू व मातोश्री.झ.मो. तुरखीया बी.एस.डब्लू. महाविद्यालय,तळोदा तसेच विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार जळगाव जिल्यातील जळगाव, चोपडा,अंमळनेर, धुळे जिल्यातील मोराने याठिकाणी प्रवेश घेता येणार असून 16 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे 18 जुलै दुपार पर्यंत स्वीकृती केंद्रावर अर्जची प्रिंट काढून जमा करावायची आहे. याच दिवशी तात्पुरती यादी संकेत स्थळावर व संबधित महाविद्यालयाच्या सूचना फालकावर जाहीर करण्यात येणार असून 19 जुलै पर्यंत आक्षेप नोंदविता येईल तर 21 जुलै रोजी सकाळी 11 ते 12 यावेळेत सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येईल प्रवेश परीक्षाचा निकाल व अंतिम गुणवत्ता यादी 25 जुलै रोजी जाहीर होईल त्यानंतर कॅप राऊंड होतील याकरिता नंदुरबार जिल्यातील प्रवेश घेण्याऱ्या विद्याथ्यांना प्रवेश द्यावायचा असेल त्यांनी www. nmu. ac. in या संकेत स्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आवश्यक कागदपत्र जोडून तळोदा समाजकार्य महाविद्यालयातील जिल्हा स्वीकृती केंद्र येथे मुदतीत जमा करण्याचे आवाहन केंद्र प्रमुख प्राचार्य उषा वसावे व समन्व्यक प्रा. निलेश गायकवाड यांनी केले आहे.