तळोदा
आज (12 जुलै) रोजी विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 11 जागांसाठी मतदान पार पडले. जागा 11 आणि 12 उमेदवार दिल्याने या निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळत होता. घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून काळजी घेण्यात आली होती. यात शिवसेनेचे (उबाठा)सचिव मिलिंद नार्वेकरांनी अत्यंत कमी मत असताना देखील बाजी मारली.
मिलिंद नार्वेकरांची विजयी घोषणा होतात. तळोदा येथे सोनार समाजाकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोनार समाज अध्यक्ष दिलीप सोनार, उपाध्यक्ष आनंद सोनार, किरण सोनार, शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे, हितेश सोनार, भुषण सोनार, प्रमोद सोनार, नितेश सोनार, पांडु सोनार, सागर सोनार, संदिप सोनार,शिवम सोनार, योगेश सोनार, राहुल सोनार, सागर सोनार, सुनिल सोनार, तुषार सोनार, गणेश सोनार आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.