वनविभाग कार्यालयातील लेखापाल लाच स्विकारताना रंगेहात अटक
लाकुड वाहतुक परवाना देण्यासाठी पैशांची मागणी
धुळे
धुळे वनविभाग उप वनसंरक्षक कार्यालयातील लेखापालाने लाकूड वाहतूक तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच मागितली व घेतली. लाच घेताच दबा धरून बसलेल्या धुळे एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले.किरण गरीबदास अहिरे असे या लाचखोर लेखापालाचे नाव आहे.
तक्रारदार हे बहाळ (रथाचे) तालुका चाळीसगांव जिल्हा जळगांव येथील रहिवाशी असुन, त्यांचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी मौजे गरताड तालुका जिल्हा धुळे येथील शेतक-यांच्या शेतात लागवड केलेल्या व तोडलेल्या सागाच्या 100 झाडांच्या लाकडाच्या 97 नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकुड वाहतुकीची परवानगी मिळण्यासाठी वन क्षेत्रपाल धुळे (ग्रामीण) यांच्याकडे अर्ज केला होता.
या परवानगीसाठी तक्रारदार हे उप वनसंरक्षक कार्यालय धुळे येथे पाठपुरावा करत होते. कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकुड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देण्यासाठी तकारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, प्रशांत बागुल व जगदीश बडगुजर या पथकाने कारवाई केली आहे.
परिवर्तन 24 न्यूज
धुळे तालुका प्रतिनिधी
संकेत बागरेचा नेर