बनावट सोन्याची माळा देऊन तळोद्यातील भाजीपाला विक्रेत्याला 5 लाख 21 हजारात फसविले
ओळखीचा अनोळखींनी घेतला फायदा

तळोदा
येथील भाजीपाला विक्रेत्याला बनावट सोन्याची माळा देऊन 5 लाख 21 हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
तळोदा येथील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे अशोक झावरु गवळे व त्यांची पत्नी सुरेखाबाई रा.सुशीला श्रीराम पार्क, तळोदा भंसाली प्लाझा समोर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असतांना दोन अनोळखी इसम त्यांच्या दुकानावर रोज भाजीपाला घेऊन जात असल्याने त्यांनी गवळे दांपत्याशी ओळख निर्माण केली.
याच ओळखीचा फायदा घेत दिनांक 21/08/2024 रोजी तळोदा येथे गवळे यांच्या दुकानावर येऊन ” मेरी बिवी और लाडकी की तबियत बहुत खराब हो गयी है,उनको इलाज के लिये धुलिया ले जाना है!” मेरे पास अस्पताल ले जाने के लिये पैसे नहीं है! असे बोलुन भाजीविक्रेते गवळे यांची सहानुभूती मिळवून दवाखान्यात कामासाठी त्यांच्याकडे 5,00,000/- रुपयाची मागणी केली.
त्याबदल्यात हमारे पास तुम्हारे लिये पाच लाख रुपये से जादा किमत के सोने के गहने है, वो सोने गहने लेने के लिये तुमको धुलिया के सरकारी अस्पताल को आना पडेगा! असे सांगुन गवळे यांना सोन्याचा मणी देऊन दिनांक 26/08/2024 रोजी रोख रुपये 21,000/- घेऊन नंतर भाजीविक्रेते गवळे यास
दिनांक 30/08/2024 रोजी सरकारी दवाखाना हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे बोलवून त्याठिकाणी गवळे यांच्याकडून रोख रुपये 5,00,000/- घेऊन त्यांना बनावट सोन्याच्या मणीच्या माळा देऊन फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तळोदा पोलीस ठाण्यात दिनांक 03/09/2024 रोजी अशोक गवळे यांच्या फिर्यादीवरुन दोन अनोळखी इसमा विरुद्ध भा.न्या. सं. कलम 318 (2) प्रमाणे फसवणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करीत आहेत.