धुळे

धुळे हादरले! एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले जीवन, पती, पत्नी आणि दोन मुलांची सामूहिक आत्महत्या

धुळे
देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.८ येथे राहणाऱ्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच वेळी चार मृतदेह घरातून मिळून आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. ही सामुहिक आत्महत्या की अन्य काही? याबाबत पोलीस कसून तपास करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवपूरमधील प्रमोदनगर प्लॉट नं.८ वर राहणारे प्रविण मानसिंग गिरासे, त्यांची शिक्षिका पत्नी दिपा प्रविण गिरासे व मुले चि. मितेश आणि चि. सोहम अशा चार जणांचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या बंद घरात मिळून आले. साधारण तीन ते चार दिवसापूर्वी ही घटना घडली असावी. कारण घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गेल्या चार दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते.
घरकामासाठी येणारी महिलाही गिरासे कुटुंब गावाला गेले असावे म्हणून ती दोन वेळा परत गेली, गॅस सिलेंडर
देणारा देखील परत गेला होता. आजुबाजूच्या लोकांना जेव्हा चार दिवसानंतरही घरातून मागमूस येत नसल्याचे लक्षात आल्याने काही जणांनी प्रविण गिरासे यांची बहीण संगिता योगेंद्रसिंग राजपूत यांना
माहिती दिली. बहीण संगिता यांनी आज सकाळी प्रविणचे घर गाठले आणि लोकांच्या मदतीने दवाजा उघडला असता घरातील एका रुममध्ये प्रविणचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले.
हे दृष्य पाहून बहीण संगिता यांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रकाश सोनार तसेच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण कौतुळे, हवालदार चंद्रकांत नागरे, सुनिल राठोड तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे, माजी नगरसेवक कमलेश देवरे, माजी नगरसेवक भगवान गवळी, अमित दुसाने, प्रफुल्ल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चारही मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयाच्या शवघरात हलविले. मयत प्रविण गिरासे he मूळचे लोणखेडी ता. जि. धुळे येथील रहिवासी होते. शहरातील पारोळा रोडवरील गल्ली नंबर 6 च्या कॉर्नरवर असलेले कामधेनु कृषी सेवा केंद्राचे संचालक होते. एका सधन कुटुंबाशी संबंधित असताना या कुटुंबात घडलेली ही भयानक घटना धुळेकरांना सुन्न करणारी ठरली आहे. ही सामूहिक आत्महत्या की अन्य काही याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

संकेत बागरेचा, धुळे तालुका प्रतिनिधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button