कॉलेज ट्रस्टच्या नवीन कार्यकारणी निवडीला तीन विश्वस्तांची असहमती

तळोदा
कॉलेज ट्रस्टवर दोन कार्यकारणी विश्वस्त मंडळांनी दावा केल्याने चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे.
अशातच रविवार दिनांक 08 सप्टेंबर रोजी अ. शि. मंडळ संचलित आर्ट अँड कॉमर्स ट्रस्ट तळोदाच्या कार्यकारणी बैठक वामनराव बापुजी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत अध्यक्ष, सचिव, सहसचिव व कोषध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
कॉलेज ट्रस्टच्या नवीन कार्यकारणीत अध्यक्ष वतनकुमार मगरे, उपाध्यक्ष प्रा सुधीरकुमार माळी, कोषाध्यक्ष नरेंद्रभाई पटेल, सचिव निखिलभाई तुरखिया, सहसचिव संजय पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
परंतु या निवडीला अध्यापक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मंगलाबाई अरुणकुमार महाजन,कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार गोरक्षनाथ महाजन, संचालक अमरदीप अरुणकुमार महाजन यांचा काहीएक संबंध नाही.आणि या तिघांनी तटस्थ भुमिका घेत त्या पदाधिकारी निवडीला असहमती दर्शविली आहे.अशी माहिती अध्यापक शिक्षण मंडळाच्या मंगलाबाई महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कॉलेज ट्रस्टच्या दोन कार्यकारणी मंडळानी दावा केल्याने आधीच वादात असणारी ट्रस्टच्या आणखी 3 विश्वस्तांनी कार्यकारणी मंडळ निवडीला असहमती दर्शवल्याने अजुन पेच वाढला आहे.