शिंदखेडा

माजी नगरसेवकाच्या पत्नीची तापीनदीत उडी घेऊन आत्महत्या

शिंदखेडा
तालुक्यातील दभाषी शिवारातून वाहणाऱ्या तापी नदीवरील पुलावरून उडी घेत माजी नगरसेवक देवेंद्र सोनार यांच्या पत्नी श्रेया सोनार यांनी आत्महत्या केली.
सात वर्षांपूर्वी विवाह पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे श्रेया यांचे माहेर होते. सुमारे ७ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह देवेंद्र सोनार यांच्यासोबत झाला. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहे. दाम्पत्यात कोणताही वाद नव्हता, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. त्यानंतरही श्रेया) यांनी टोकाचे पाऊल काउचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही.
दभाषी गावाजवळील तापी नदीवरील पुलावर शनिवारी सकाळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एका महिलेने दुचाकी पुलावर उभी करून नदीत उडी घेतली. हा प्रकार एकाने बघितल्यावर त्याने पोलिसांना कळवले. या वेळी पोलिस
अधिकारी नीलेश मोरे यांचे पथक गस्तीवर होते. ते घटनास्थळी आले. पुलावरील दुचाकीच्या डिकीत आधार कार्ड आढळले. त्यावर श्रेया देवेंद्र सोनार (वय २९, रा. सुभाषनगर, नं. ९, जुने धुळे) असे नाव होते. ग. या घटनेची माहिती सोनार कुटुंबीयांना
देण्यात आली. त्यानंतर सोनार कुटुंब दभाषीला आले. तोपर्यंत पोलिसांनी मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने श्रेया सोनार यांचा शोध सुरू केला होता. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास श्रेया सोनार यांचा मृतदेह सापडला. तो रुग्णवाहिकेने (एमएच १८, एए ७४५० उत्तरीय तपासणीसाठी नरडाणा आरोग्य केंद्रात नेला. या ठिकाणी डॉ. राजपूत यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत श्रेया यांचे चुलत सासरे जितेंद्र सोनार (वय ४८) यांच्या माहितीवरून नरडाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (४१/२०२४) झाली. उपनिरीक्षक मनोज कुवर तपास करत आहे. शहरातील हिरे रुग्णालयात उद्या रविवारी शवविच्छेदन होईल, असे पोलिसांनी सांगितले.

धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button