नंदुरबार लोहमार्ग पोलिसांची कामगिरी! धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरास केले जेरबंद

नंदुरबार
लोहमार्ग पोलीस ठाणे नंदुरबार येथे रेल्वे स्टेशन दोंडाईचा आऊटवर दिनांक 01 सप्टेंबर 2024 यातील फिर्यादी नामे विकास बच्छाव जाधव वय ते 30 धंदा इंजिनिअर पो. भोलाणे तालुका पारोळा जी जळगाव हे मुक्ताईनगर येथे सासरी पत्नीकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन नंदुरबार ट्रेन नं 19483 डा. अहमदाबाद – बैरानी एक्सप्रेसचे जनरल कोच मध्ये दरवाज्यात बसून नंदुरबार रेल्वे स्टेशन येथून प्रवास करीत असताना रेल्वे स्टेशन दोंडाईचा येथे अगोदर ट्रेन हळू धावत असताना ट्रेन बाहेरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातात असलेला एक रेडमी 12 जे कंपनीच्या काळ्या रंगाच्या मोबाईल कीं. 16,000/- रु. चा हिसकावून घेऊन पळून गेला. त्यामध्ये फिर्यादी धावत्या रेल्वेतून पडून त्याच्या डावा पायाच्या पंजा गाडीखाली येऊन चेंदामेंदा झाल्याने जबर दुखापत झाली. त्यांनी दिलेल्या जबाब वरून लोहमार्ग पोलीस ठाणे नंदुरबार येथे गुन्हा रजिस्टर नं. 393/2924 कलम 311,305,304(2)बी. एस. एन. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासप्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ यांनी तपास कामी हाती घेतला.
सदर गुन्ह्याची वरिष्ठांना माहिती देऊन गुन्ह्याची गंभीरता ओळखून फिर्यादी यांनी
संशयीताचा थोडक्यात स्वरूपात दिलेल्या वर्णनावरून सपोनि शेजवळ व स्टाप रेल्वे पोलीस स्टेशन नंदुरबार व रेल्वे सुरक्षा बल नंदुरबार असे संयुक्तरित्या तपासात गोपनिय माहितीद्वारे तपास चक्रे फिरवून दोंडाईचा शहरात डांबरी घरकुल, दोंडाईचा येथून शुभम उर्फ बंटी अनिल भोई, वय 19 वर्ष, रा. डांबरी घरकुल, दोंडाईचा यास सदर गुन्ह्यात अटक अटक करण्यात येऊन तपासा दरम्यान सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला रेडमी कंपनीचा मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर, स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड,मारुती पंडित यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ,रेसुब निरीक्षक बसंत राय,असई विकास पाटील, वैभव पाटील, प्रकाश गोसावी, किरण बोरसे,जितेंद्र चौधरी, निलेश महाजन, वैभव पाटील सायबर सेल,बाबुलाल गुर्जर,नरेंद्र पाटील, परेश भाई यांनी संयुक्तपणे केली आहे.
प्रविण चव्हाण, नंदुरबार तालुका प्रतिनिधी