नंदुरबार शहरात गुटख्याची कारवाई एकुण 2,25,448/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

“जिल्हयात अवैध धंदयावर सतत कारवाई सुरू असून अवैध धंदे करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक जनतेसाठी सार्वजनिक केल्याने त्यांना नंदुरबार वासियांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्याअन्वये दिनांक 01 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना गुप्त माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील अमर टॉकीज जवळील ज्ञानेश्वर उर्फ नाना दिलीप चौधरी याच्या घराच्या मागील बाजुच्या परिसरात दि.02 सप्टेंबर रोजी सकाळी गुटखा उतरणार आहे, अशी माहिती मिळाली.
सदर बातमीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त.एस, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, आर.एस.वावरे, पोउपनि, एस.बी. आहेर, पोकॉ राहूल बोराळे, पोकों कल्पेश मोरे असे पथक मिळालेल्या बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी दि.02 सप्टेंबर रोजी सकाळी रवाना झाले. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस पथक हे सकाळी नंदुरबार शहरातील अमर टॉकीज जवळ राहणा-या ज्ञानेश्वर उर्फ नाना दिलीप चौधरी, याच्या घराच्या मागील बाजुच्या परिसरात खात्री करणेकामी सापळा लावून वाट बघत असतांना एक काळी पिवळी रंगाची अॅपे रिक्षा क्रमांक (एमएच 39 डी 2185) असे बातमी प्रमाणे वाहन रस्त्याने येतांना दिसले. सदर वाहनास पोलीसांनी थांबविले. त्यातील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सागर नामदेव मराठे, (22) रा. दयाल नगर, वाघोदा रोड, नंदुरबार असे सांगितले. त्याचे ताब्यातील अॅपे रिक्षाची तपासणी करता त्यात निळया व पांढ-या रंगाच्या गोण्यांमध्ये विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी असा वाहनासह एकुण 1,63,528/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल लागलीच जप्त करण्यात आला.
सदर मुद्देमालाबाबत रिक्षाचालक सागर मरादे, यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे ताब्यातील मुद्देमाल हा ज्ञानेश्वर उर्फ नाना दिलीप चौधरी ( 52) रा. अमर टॉकीज जवळ, नंदुरबार याचा असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलीसांचे पथकाने सदर ज्ञानेश्वर उर्फ नाना दिलीप चौधरी यास घटनास्थळी बोलावुन विचारपूस करता त्याने सदरचा माल हा त्याचेच असल्याचे सांगितले. तसेच त्यास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्यांनी अमर टॉकीज परिसरातील राजु भाजीवाला याचे घरी काही प्रमाणात गुटखा ठेवला असल्याची माहिती दिल्याने लागलीच पोलीस पथकाने राजु भाजीवाला याचे घरी जाऊन राजु भाजीवाला यास घटनेची माहीती दिली. राजु भाजीवाला याचे घरातुन विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी असा एकुण
61,920/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
त्याअन्वये आरोपी क्रमांक. सागर नामदेव मराठे (22)
रा.दयाल नगर, वाघोदा रोड, नंदुरबार
ज्ञानेश्वर उर्फ नाना दिलीप चौधरी ( 52) रा. अमर टॉकीज जवळ,नंदुरबार
राजु भाजीवाला, रा. नंदुरबार यांचे ताब्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, वाहन व इतर मुद्देमालासह एकूण 2,25,448/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 547/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123. 274. 275, सह अन्न सुरक्षा मानके व मोजके अधि. 2006 चे कलम 26(2) (i), 26(2) (iv), 27(2)(d), 27(2)(e). 3(1)(zz)(i), 3(1)(zz) (v), 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास शहर पोलीस पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. गुंजाळ हे करीत आहेत.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक आर.एस.वावरे, पो उपनि.एस. बी. आहेर, पोकों राहूल बोराळे, पोकों कल्पेश मोरे आदीनी केली आहे.
प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार