नेमसुशिल शैक्षणिक समूहात स्मार्ट पॅनल बोर्डच्या अध्यापनातून सर्व वर्गांना लाभ

तळोदा
शहरातील अग्रेसर नेमसुशिल शैक्षणिक समूहात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने वर्ग व शालेय विभाग निहाय स्मार्ट पॅनल बसविण्यात आले या आधी देखील विद्यामंदिरात स्मार्ट पॅनल बोर्ड उपलब्ध असून आता अधिकचे स्मार्ट पॅनल बोर्ड बसवून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात सुकरता येईल प्रसंगी संस्थेचे समनव्यक हर्षिलभाई तुरखीया यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि त्यास तंत्रज्ञानाची जोड आवश्यक असते.या उक्तीला प्रमाण मानून नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या प्रत्येक वर्गात स्मार्ट पॅनल बोर्ड बसविण्यात येत असून आता विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे.
स्मार्ट बोर्ड च्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांना अध्यापन करणे अधिक सोपे जाणार असून अध्यापनातील काठिण्य पातळीतील संबोध आता सहज स्पष्टीकरण होण्यास मदत देखील होणार आहे.
पालकांनी देखील प्रत्येक वर्गात बसवण्यात येणारे स्मार्ट बोर्ड उपक्रमाचे कौतुक केले असून समाधान व्यक्त केले आहे. पॅनल बोर्डच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया,संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी एम महाले,सचिव संजयभाई पटेल ,समनव्यक हर्षिलभाई तुरखीया ,मुख्या. पुष्पा बागुल, मुख्या. सुनिल परदेशी,प्रिन्सिपल पी.डी.शिंपी,मुख्या. श्रीमती भावना डोंगरे,मुख्या. गणेश बेलेकर,कल्याणी वडाळकर विद्यामंदिरातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.