पाडळपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषदेचे तिसरे पुष्प उत्सहात संपन्न

तळोदा
तालुक्यातील प्रतापपूर केंद्राच्या शिक्षण परिषदेचे तिसरे पुष्प पाडळपूर येथील जिल्हा परिषद शाळेत निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत गायन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान प्रतापपूर केंद्राचे केंद्र प्रमुख रंजना निकुंभे यांना देण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, शालेय पोषण आहार अधीक्षक तथा विस्तार अधिकारी वसंत जाधव उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांचा सहभाग होता.
पाडळपूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला. त्यानंतर शिक्षिका ठाकूर मॅडम यांना यावर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याने प्रतापपूर केंद्राच्यावतीने सत्कार करण्यात आला.
जगाचे ज्ञानदाते, विद्येच्या क्रांतीचे जनक मानल्या जाणाऱ्या शिक्षक बंधू बघीनिंनी एका निश्चित दिनी एकत्र येऊन आपले ज्ञानदानाचे पवित्रकार्य अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी केलेल्या विचारसंवादाची देवाणघेवाण म्हणजेच शिक्षण परिषद
शिक्षण परिषदेचे तिसरे पुष्प उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमानंतर शाळेच्यावतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते