पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवीतील ‘विरासत ए बंजारा’ संग्रहालयाचे अनावरण! अक्षय राठोड यांनी बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले

बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची नव्यापिढीला माहिती व्हावी, यासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ‘विरासत एबंजारा’ संग्रहालय उभारले जात आहे. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या २६ सप्टेंबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे अनावरण केले जाणार आहे.
पोहरादेवी येथे नगारा प्रतिकृतीवास्तू संग्रहालयाचे निर्माण कार्यतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रसंत डॉ. संत रामराव बापू महाराज यांच्या हस्ते
भूमिपूजन होऊन ३ डिसेंबर २०१८ रोजी सुरू झाले. ६ वर्षानंतर हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री संजय राठोड, साधुसंतांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला समाज बांधवाणी उपस्थित राहावे असे आवाहन अक्षय राठोड भावी आमदार कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे