नंदुरबार

सावधान! व्हाट्सॲपवर गैरसमज व अफवा पसरविणा-या ग्रुप एडमिनसह 2 मेंबर्सवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नंदुरबार
शहरात दि.19 सप्टेंबर रोजी दोन गटात किरकोळ कारणावरुन दगडफेकीची घटना घडली होती. त्याअन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 579/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,190,132 व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याच दरम्यान दगडफेकीतील आरोपींना चौकशीकामी शहर पोलीस ठाण्यात आणले जात आहे.त्यापैकी एका संशयित इसमाचा मोबाईल पोलीस चौकशी दरम्यान तपासला असता त्याचे मोबाईल मधील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एका मोबाईल क्रमांक धारकाने दंगलीचा एक व्हिडीओ पोस्ट करुन त्याखाली नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे लिखाण केले होते.तसेच सदर व्हॉट्सअप ग्रुपमधील अजुन एका मोबाईल क्रमांक धारकाने काही वेळानंतर अशाच प्रकारची अफवा पसरवून शहरातील शांतता भंग होऊन जनमाणसात भितीचे वातावरण निर्माण होईल अशी चिथावणीखोर पोस्ट केली होती.
सदर प्रकाराबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपचे एडमीनने ग्रुपमधील गैरसमज व अफवा पसरविणारे व्हिडीओ पोस्ट डिलीट करणे गरजेचे असतांना सदर पोस्ट डिलीट केले नाहीत तसेच ग्रुपमध्ये अशा प्रकारची पोस्ट टाकणारे दोनही मेंबर्स (मोबाईल क्रमांक धारक) यांना ग्रुपमधुन वगळले नाही. म्हणुन व्हॉट्सअॅप ग्रुप एडमिन व पोस्ट करणारे दोन्ही सदस्य अशांवर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि. विकास गुंजाळ करित आहेत.

तरी नागरिकांनी दोन धर्मात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनुचित पोस्ट व्हिडीओ,गैरसमज पसरवू नये. आपले पोस्ट,वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माची अथवा समाजाची भावना दुखावणार नाही.याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.

तसेच नंदुरबार सायबर सेल अशा प्रकारचे सोशल मिडियावर गैरसमज व अफवा पसरविण्या-यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत.
तसेच नागरिकांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी पोलीस प्रशासनास
सहकार्य करावे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस,पोस्ट दिसून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधवा,
असे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस नंदुरबार यांनी आवाहन केले आहे.

प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्यूज नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button