नंदुरबार
सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथे डोळे तपासणी शिबिर संपन्न

नंदुरबार
तालुका विधायक समिती संचालक श्री सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे. वर्ग 5 वी ते 10 वी) राष्ट्रीय अंधत्व कार्यक्रमातर्गत डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
या तपासणी साठी खोंडामळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रविण पाटील समुपदेशक तसेच डॉक्टर योगेश सोनवणे यांनी अतिशय सखोल पद्धतीने व बारकाईने विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी केली.
यावेळी ज्या विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज आहे त्यांना पुढील तपासणीसाठी खोंडामळी ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहेत व तिथे त्यांना डोळ्यांची काळजी घेणार या बाबत मार्गदर्शन केले.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.
या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
प्रविण चव्हाण 24 न्युज नंदुरबार