तळोदा – रेशन दुकानदाराविरोधात ग्रामस्थ एकवटले,तहसीलदारांपुढे मांडला मनमानी कारभार
युनिट प्रमाणे धान्य देण्याची मागणी

तळोदा
तालुक्यातील सेलिंगपूर रेशन दुकानदार युनिट प्रमाणे धान्य देत नसल्याने आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी तळोदा तहसीलदार यांच्या दालनात ग्रामस्थांनी लेखी निवेदन देत उपोषणास बसण्याच्या पवित्रा अवलंबला होता.
ग्रामस्थांची तक्रार लक्षात घेत तहसीलदार दिपक धिवरे यांनी लागलीच पुरवठा निरीक्षक यांना सेलिंगपूर येथे पाठवुन रेशन दुकानदारास युनिट प्रमाणे धान्य वाटपाच्या सुचना दिल्यावर ग्रामस्थांनी उपोषणास बसण्याचा निर्णय मागे घेतला.
दारिद्र्यरेषेवरील रेशनकार्डधारक व प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना गहू, तांदूळ मिळून युनिट प्रमाणे एकुण 5 किलो धान्य देण्यात येते. परंतु काही ठिकाणी रेशन दुकानदार नफाखोरी करुन धान्याचा काळाबाजार करीत असतात.जागरूक नागरिक मनमानी कारभाराविषयी तक्रार करुन शासनाच्या नियमानुसार धान्य मिळावे यासाठी अग्रेसर असतात.
अशाच प्रकरणाला सेलिंगपूर येथील नागरिकांनी वाचा फोडली. सकाळी तळोदा तहसील आवारात नागरिकांची प्रचंड गर्दी होती.ग्रामस्थांसह तळोदा येथील जय आदिवासी ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दिपक धिवरे यांची भेट घेऊन रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी केली.
यावेळी सेलिंगपूर येथील अंकित डोंगरे,जामसिंग मोरे,गोविंदा ठाकरे, सागर पाडवी,कांतीलाल ठाकरे, रमण वळवी,आशिष मोरे,आश्विन डोंगरे,राजेंद्र चव्हाण,शमुवेल मार्गे,गणेश मोरे, रायसिंग मोरे तसेच
जय आदिवासी ब्रिगेड संघटनेचे विनोद माळी,कालुसिंग पाडवी, चेतन शर्मा,तुषार पाडवी,रोहित साळूंखे, किरण पाडवी, उलु पाडवी,विकास धानक आदी पदाधिकारी व महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते