तळोदा तालुक्यात व शहरात येणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा!जय आदिवासी बिग्रेडची मागणी

तळोदा
तालुका व शहरात नरभक्षक बिबट आणि मानवी जीवन संघर्षमय झाले आहे. सर्वच स्तरातून बिबट जेरबंद करण्याची मागणी वाढत आहे.
त्याअनुषंगाने आज सोमवार दिनांक 09 सप्टेंबर रोजी जय आदिवासी ब्रिगेड संघटनेच्या वतीने तळोदा तालुका पदाधिकाऱ्यांनी उपवन संरक्षक अधिकारी, तळोदा यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तळोदा शहरातील व तालुक्यातील आजूबाजूचे परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असुन हे प्राणी वस्तीत शिरून अचानक लहान मुलं, स्त्री, पुरुषांनावर हल्ला करीत आहेत त्यामुळे मानवी जीवास आपल्या प्राणाला मुकावे लागते. या 15 दिवसात 4 ते 5 अशा घटना तळोदा तालुक्यात घडल्या आहेत.बिबटचे मोठ्या प्रमाणात शहरातील, ग्रामीण भागात, शेत शिवार व आजूबाजूच्या परिसरात येऊन मानवी जीवावर बिबटचे हल्ला करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनेमुळे तालुका व शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागामार्फत बिबटचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बिबट हल्ल्यात मयत झालेल्यांच्या वारसाना शासनाकडून त्वरित मदत मिळण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर विनोद माळी, प्रेम पाडवी, कालूसिंग पाडवी, चेतन शर्मा, अक्षय धानका, दिपक पाडवी, नामदेव पाडवी, संदीप पाडवी, रोहित साळुंखे, विशाल धानका, किरण पाडवी, राहुल पाडवी आदींच्या सह्या आहेत व वरील सर्व निवेदनदेतेवेळी उपस्थित होते.