तळोद्यात नगरपथ विक्रेता समितीची निवडणूक झाली बिनविरोध

तळोदा
शहरातील पथविक्रेत्यांसाठी नगरपथ विक्रेता समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.शहर फेरीवाला समिती निवडणूक २०२४ ची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदुरबार नगर परिषदचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत खुला सर्वसाधारण महिला प्रवर्गात मनीषा गोरख भोई,खुला सर्वसाधारण प्रवर्गात नितीन सुरेश कर्णकार व शर्मिला राजेंद्र पाडवी व विकलांग प्रवर्गात निलेश रवींद्र माळी यांचे त्या त्या प्रवर्गात एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित तीन जागांसाठी अर्ज न दाखल झाल्या रिक्त राहिल्यात.निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सहाययक निवडणूक अधिकारी म्हणून दीपक पाटील व पर्यंवेक्षक राजेंद्र माळी यांचेसह अश्विन परदेशी, मनमोहन सूर्यवंशी, श्रीमती जयश्री मगरे,लखन कंधरे,अनिल माळी, निलेश अहिरे,दिगंबर माळी आदींनी परिश्रम घेतले.