नंदुरबार

वाहतुकीचे नियम न पाळल्यास खबरदार.. ! शहर वाहतूक शाखेतर्फे सुरू असलेल्या मोहिमेत मो. वाहन कायदयान्वये आतापावेतो 480 कारवाया व 1,31,200/- रुपयांचा दंड वसूल…

नंदुरबार
वाढते अपघात, वाहन चोरी, वाहतूक कोंडी, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह अशा विविध बाबींवर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखे तर्फे दिनांक 02 सप्टेंबर 2024 पासून शहरातील विविध ठिकाणी मोहिम राबविण्यात येऊन कारवाई केली जात आहे. सदरची कारवाई ही जिल्हयात सुरूच राहणार असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी सांगितले.
शहरातील महात्मा गांधी पुतळा, नेहरु चौक, बस स्टॅन्ड परिसर, अंधारे स्टॉप, धुळे चौफुली, नवापूर चौफुली, साक्री नाका, इ. अशा वेगवेगळया ठिकाणी मोहिम राबविण्यात येऊन, त्यामध्ये सर्व प्रकारचे वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वाहतुक कोंडी करणे, ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, वाहनाचे कागदपत्र सोबत न बाळगणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबर प्लेट, रहदारीस अडथळा निर्माण करणे, विना इन्शुरन्स वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध सायलेन्सर वापरणे, इ. सदराखाली मोटार वाहन कायदयाचे वेगवेगळ्या कलामांतर्गत एकुण 480 केसेस करण्यात येऊन आता पावेतो तब्बल 1,31,200/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये वाहनाचे कागदपत्र न बाळगणारे असे एकुण 182 मोटारसायकली मोटार वाहन कायदयान्वये डिटेन करण्यात आले आहेत. सदर वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असून त्यांचे परवाने निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्पष्ट केले आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. नंदुरबार उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत जाधव व वाहतूक शाखा अंमलदार यांनी केली आहे.

“शहरात वाहतूक पोलीस यांचे कारवाईमुळे वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांना धडकी भरली आहे.

तसेच यापुढे देखील जिल्हयात वेळोवेळी अशा प्रकार ची
मोहिम राबविण्यात येऊन वाहतुकीचे नियम मोडणा-यांविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी दिला आहे.”

प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button