अक्कलकुवा – शालार्थ आय डी व पगार काढून देण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारणारे दोन शिक्षकांसह एजंट एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराची पत्नी शिक्षिका तसेच आणखी एका शिक्षिकेची शालार्थ आय डी प्रणाली मध्ये समाविष्ठ करण्यासाठी आणि एका शिक्षिकेचा थकीत पगार काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या तिघे नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
सन 2021 – 2022 सालापासून तक्रारदार यांनी पत्नी शिक्षिकेसह एक शिक्षिका या दोघांचे नाव शालार्थ आयडी मध्ये समाविष्ट करण्यासाठी तसेच एका शिक्षिकेचा अडकलेला पगार काढून देण्यासाठी तक्रारदार यांचे कडून 1,10,000/- रु. धुळे येथील एजंट अरुण पाटील यांना देण्यासाठी मोलगी येथील शिक्षक इंद्रजीत सर व अक्कलकुवा येथील शिक्षक रोशन पाटील यांनी त्यापैकी सुरुवातीला टोकन अमाऊंट प्रत्येकी 20,000/- रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी बाबतची पडताळणी कारवाई दिनांक 25/09/2024 रोजी पंचांग समक्ष केली व नमूद मागणी केलेली रक्कम दिनांक 29/09/2924 रोजी पंचांग समक्ष स्वीकारले आहे.
तसेच अरुण पाटील यांना अँटी करप्शन ब्युरोच्या अंमलदारांनी धुळे येथून ताब्यात घेऊन अँटी करप्शन ब्युरो नंदुरबार कार्यालयात आणले त्यावेळी अरुण पाटील यांना तक्रारदार यांनी पंचांसमक्ष पाहिले असता तक्रारदार यांनी मी धुळे येथे भेटायला गेलो तेव्हा माझ्याकडून माझ्या पत्नीचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी लाचेची मागणी करणारे व मागणी केलेली रक्कम इंद्रजीत सर व रोशन पाटील सर यांच्याकडे देण्यात सांगणारे इसम तेच असल्याचे तक्रारदार यांनी पंचासमक्ष सांगितले आहे. म्हणून फिर्यादी यांनी मोलगी येथील शिक्षक इंद्रजीत सर व अक्कलकुवा येथील रोशन पाटील सर तसेच धुळे येथील एजंट अरुण पाटील यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.