नंदुरबार

धडगाव येथे गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 5 लाख 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व धडगाव पोलिसांची संयुक्त कारवाई

नंदुरबार
दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील कुकलट वरचापाडातील दोन इसमांनी कापसाचे शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररित्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे, अशी माहिती मिळाल्याने नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखा व धडगांव पोलीसांचे एक पथक तयार करुन कारवाई करण्याची सुचना केली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व धडगांव पोलीसांचे पथक मिळालेल्या गोपनीय बातमी प्रमाणे धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील कुकलट ते कात्रा रोडवर एका कापसाचे शेताजवळ आले. शेताच्या बांधावर दोन इसम हालचाल करत असल्याचे दिसुन आले, पोलीस पथक त्यांचे दिशेने येत असल्याचे लक्षात येताच शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या दोन्ही इसमांनी तेथून पळ काढला, सदर ठिकाणी पोलीस पथकाने शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केलेली असल्याचे दिसुन आले, म्हणून पथकांनी संपूर्ण शेत पिंजुन काढले असता तेथे संपूर्ण शेतातून 50 किलो 02 ग्रॅम वजनाचे एकुण 05 लाख 200 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आली.

सदर गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात आली.

तसेच बेकायदेशीररित्या गांजा सदृष्य झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करतांना आरोपी नामे.सायका ऊर्फ सायसिंग ठुमला पावरा,थिक्या ऊर्फ गोमा दुमला पावरा दोन्ही रा. कुकलट वरचापाडा ता. धडगांव जि. नंदुरबार यांचेविरुध्द् धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 187/2024 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 चे कलम 8 (क), 20(ब), ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहादा, उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, धडगांव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक
राजेंद्र जगताप, स्थानिक गुन्हे पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, राकेश वसावे, विशाल नागरे, सुनिल पाडवी, बापु बागुल, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, विजय ढिवरे, दिपक न्हावी, यशोदिप ओगले, अभिमन्यु गावीत तसेच धडगांव पोलीस ठाणे पोलीस हवालदार स्वप्निल गोसावी, पोलीस अंमलदार विनोद पाटील, प्रतापसिंग गिरासे यांनी केली आहे.

प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button