तळोदा

जि.प.शिक्षिका राजश्री पाटील यांच्या शैक्षणिक व्हिडिओला राज्यस्तरावर शासनाचे प्रथम पारितोषिक

तळोदा
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातील कढेल येथील प्राथमिक शिक्षिका राजश्री पाटील यांनी तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओला राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

यात शासनाकडून त्यांना पन्नास हजार रुपये रोख, विजय चिन्ह व सुवर्ण पदक पुणे येथील भव्य शासकीय कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.आदिवासी ग्रामीण भागातील शाळेत कार्यरत शिक्षिकेने आपल्या कार्याने मिळविलेल्या या यशाने निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

१ऑगस्ट ते ३१डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चे आयोजन राज्य शासनाकडून करण्यात आले होते. या अंतर्गत तालुका, जिल्हा व राज्य या प्रत्येक स्तरावर प्रत्येकी सहा गटामधून एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. सदर सर्व स्तराचे मूल्यमापनाचे कामकाज शासन स्तरावर पूर्ण करण्यात आले होते शासनाच्या मान्यतेने राज्यस्तरावरील निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार एकूण सहा गटामधून एकूण २८ विषयासाठी एकूण ८४ बक्षीसाचे (प्रथम, द्वितीय तृतीय) वितरण करण्यासाठी दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी महात्मा फुले सभागृह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी आयोजित पारितोषिक वितरण समारंभ कढेल (ता. तळोदा) येथील शिक्षिका राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक व रोख बक्षीस प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले त्यामुळे तळोदा तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागासाठी ही गर्वाची बाब आहे.

आजकाल इंग्रजी शाळांचे महत्त्व पालकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असतांनाही एका ग्रामीण आदिवासी बहुल भागातील जि. प. शाळेतील शिक्षिका राजश्री निंबा पाटील आपल्या विद्यार्थ्यांसाठी जीवाच्या आकांताने त्यांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण देता यावं या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयोग राबवित असतात. त्यात त्यांनी परसबाग कृतीयुक्त शिक्षण डिजिटल स्कुल इ. अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आणि शाळेला उंचीवर नेले आहे स्पष्टपणा, गरजाधिष्ठितपणा, परिणाम, नाविण्यता, समन्वय, उपयोगिता, चित्रफीत दर्जा हे निकषानुसार पारितोषिक प्राप्त व्हिडिओ निर्मिती करत असताना देखील त्यांनी आपल्या शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांचाच या व्हिडिओमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी देखील मुळाक्षरे तसेच विविध शब्दांपासून पूर्णतः परिचित झालेले आहेत.हा व्हिडिओ साधा आणि सरळ पद्धतीने कार्टून फिल्म चा वापर करून तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवर रेखाटलेले मूळाक्षर तसेच शब्दाचे वाचन देखील विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आलेले आहे राजश्री पाटील यांच्या व्हिडिओची तालुकास्तरावर त्याचबरोबर जिल्हा स्तरावर , विभाग स्तरावर व शेवटी राज्यस्तरावर पहिल्या क्रमांकाने निवड झालेली आहे.

त्यामुळे राजश्री पाटील यांना शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी ठीक १०.०० वाजता महात्मा फुले सभागृह राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या ठिकाणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते व केंद्रीय सहसचिव शालेय शिक्षण अर्चना शर्मा-अवस्थी प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग श्रीमती आय ए कुंदन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक राहुल रेखावार शिक्षण आयुक्त सुरज मांढरे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद श्रीमती आर विमला इ. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

सन २०२३ मध्ये शासनाच्या वतीने विविध विषय डोळ्यासमोर ठेवून व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि मी एका सामान्य खेडेगावातून जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम करते त्या दृष्टीने माझ्या शाळेतील विद्यार्थी हा शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण व्हावा यासाठी मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक बाबींना विचारात घेऊन त्याच दृष्टीने या व्हिडिओची निर्मितीचा हा माझा प्रयत्न यशस्वी होऊन त्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली
राजश्री पाटील
(शिक्षिका जिल्हा परिषद कढेल ता. तळोदा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button