खानदेशातील गुजर समाजाला आर्थिक महामंडळ मिळाल्याबद्दल चोपड्यात आनंदोत्सव..!

खानदेशातील गुजर समाजाला आर्थिक महामंडळ मिळाल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री रक्षा खडसे, व अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी समाजाला मिळालेले हे महामंडळ आनंदाची बाब आहे.
या कार्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार मानण्यासाठी चोपडा नगरपरिषदेजवळ दि. ११ रोजी दुपारी १ वाजता समाजातील सर्व पोट जाती व लोकप्रतिनिधी यांनी आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
विलास पाटील (खेडीभोकरीकर) यांनी समाज बांधवांना केवळ व्हाट्सअप द्वारे मेसेज टाकून एकत्र गोळा केले. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी या संदर्भात समाजात जनजागृती केली त्यांचे योगदान अमूल्य आहे अशा शब्दात माजी जि.प.अध्यक्ष छन्नू झेंडू पाटील उर्फ गोरख तात्या यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
दोडे गुजर संस्थांचे अध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील, छन्नू झेंडू पाटील, जी टी पाटील, भाजपचे लक्ष्मण पाटील,जितेंद्र महाजन धानोरा, गजानन चौधरी, संदीप गुजर आदींनी एकत्र येऊन या आनंदोत्सवात भाग घेतला.
समस्त गुजर समाजातील मान्यवरांनी प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यानंतर सवाद्य मिरवणूकीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील,संचालक गोपाल पाटील, नगरसेवक राजाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, गुजर संस्थांचे संचालक डी बी पाटील, डॉ.तृप्ती पाटील,दंत रोग तज्ञ डॉ.राहुल पाटील, कवी लेखक तथा साहित्यिक रमेश जे.पाटील,माजी सभापती कांतीलाल पाटील,प्रा.एस के पाटील,राजेंद्र पाटील (कल्याण), डॉ.अनिल रामदास पाटील, डॉ.पंकज पाटील,डॉ.पारस पाटील,किशोर पाटील (गोरगावले),संभाजी पाटील (आडगाव), सुनील महाजन, राजेंद्र गंगाधर पाटील (वेले), अरुण पाटील, कैलास पाटील, भिका पाटील, हिम्मतराव पाटील (गरताड), गजानन पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजर समाजाला ७० लाख रुपये समाज भवनासाठी मिळाले आहेत लवकरच त्याचा भूमिपूजन समारंभ येत्या १३ तारखेला होणार असून यावेळी समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन कृ.उ.बा.समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी यावेळी समाज बांधवांना केले.
प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार