मध्यप्रदेश निर्मित विना परवाना बिअर साठ्यावर म्हसावद पोलिसांची कार्यवाही! एकूण 2 लाख 47 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त.

शहादा
तालुक्यातील म्हसावद पोलिसांनी मध्यप्रदेश निर्मित विना परवाना बिअर साठ्यावर दमदार कार्यवाही केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहादा तालुक्यातील नागझिरीचा उकलापाणीपाडा गावात बिजला तेजला वळवी रा.नागझिरीचा उकलापाणीपाडा यांच्या राहत्या घराच्या आडोश्याला रतिलाल आलम भिल हा खाकी रंगाच्या बॉक्स मध्ये पॉवर कुल बियरची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने प्रोव्हीशन गुन्ह्याच्या मुद्देमाल लपवुन ठेवला आहे.अशी माहीती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाल्याने म्हसावद पोलिसांनी बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास धाड टाकून 2 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे.
सदर इसम पळून गेला.ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, सुनिल बागूल,जितेंद्र पाडवी,रामदास पावरा,अजित गावित,दादाभाई साबळे राकेश पावरा,उमेश पावरा,वसंत वसावे सचिन तावडे आदींनी कार्यवाही केली.