नंदुरबार

मोटार सायकलींचे एकुण 5 गुन्हे उघड,चोरीच्या 18 मोटारसायकली हस्तगत; नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..!!

शहादा
पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी बायला रुल्या पाडवी यांची होंडा कंपनीची मोटर सायकल ही त्यांचे राहत्या घराचे अंगणातून चोरी झाले बाबतची फिर्याद वरुन शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 460/2024 भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना बातमी मिळाली की, तळोदा शहरात बस स्थानक परिसरात दोन इसम एक विना क्रमांकाची मोटारसायकल विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी लागलीच एक पथक तयार करुन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीचे अनुषंगाने तळोदा शहरातील बस स्थानक परिसरात जावून खात्री केली असता, दोन इसम हे विना क्रमांकाचे दुचाकीसह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी त्यांचे नाव अशोक सरदार पावरा,
रविंद्र चिवला पावरा, दोन्ही रा.रेवानगर ता. तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमांना त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता ते उडवा – उडवीची उत्तरे देऊ लागले.त्यांना अधिकची विचारपूस केली असता त्यांनी सदरची गाडी नवलसिंग चव्हाण, रा. गोगलपूर जि. अलीराजपूर, मध्य प्रदेश व त्याचे सोबत असलेल्या एका साथीदाराकडून भूषा ता.धडगाव येथे विकत घेतल्याचे सांगितले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भुषा ता. धडगाव येथे नवलसिंग चव्हाण व त्याचा साथीदाराचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नावे नवलसिंग रुपला चव्हाण, नस-या नाहल्या कनेश, दोन्ही राहणार गोगलपूर पो.उमराली जि. अलीराजपुर असे सांगितले, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमांकडे मिळून आलेल्या मोटारसायकली बाबत अधिकची विचारपूस करता त्यांनी काही मोटारसायकली शहादा शहराजवळ असलेल्या एका खेडे गावातून चोरी केले असल्याचे कळविले.

सदर इसमांकडे अजुन काही मोटारसायकली असण्याची दाट शक्यता असल्याने त्यांना अधिकची विचारपुस करता त्यांनी मागील काही वर्षांमध्ये गुजरात व मध्यप्रदेश राज्यातुन काही मोटारसायकली चोरी केल्या असून सदर मोटारसायकली, अशोक पावरा, रविंद्र पावरा यांचे मदतीने विक्री केल्याचे सांगितले. तसेच काही मोटार सायकली अशोक पावरा व रविंद्र पावरा यांचे राहते घराचे परिसरात लपवून ठेवले असल्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

तरी वरील नमुद इसमांकडुन स्थानिक गुन्हे शाखेला एकुण 08,15,000/- रु. किमतीच्या एकूण 18 मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.

ही कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पो.उनि मुकेश पवार, बापू बागुल, विशाल नागरे, सुनिल पाडवी, मनोज नाईक, विकास कापूरे, पुरूषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विजय ढोवरे, शोएब शेख, अभिमन्यु गावित, दिपक न्हावी यांनी केली आहे.

प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button