प्रकाशा – रामदास नगराळे यांची भारतीय जनता पार्टीच्या दलित आघाडी उपाध्यक्ष पदी नियुक्ती

नंदुरबार
विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या मेळाव्यात जयनगर येथील रामदास नगराळे व त्यांचे समर्थक यांनी सुद्धा आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित व भाजपा नंदुरबार उपाध्यक्ष कृष्णाभाऊ कोळी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. रामदास नगराळे यांची प्रकाशा मंडळ बूथ भाजपा दलित आघाडी उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्याहस्ते देण्यात आले. तसेच रामदास नगराळे यांचा सत्कार करण्यात आला.

या नियुक्तीबद्दल व पुढील राजकीय वाटचालीस परिसरातील भाजपा कार्यकर्ते व मित्र मंडळींनी नगराळे यांना अभिनंदन करीत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.