सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना होणार सुरु

शहादा
परिसराच्या विकासाचा साथीदार असलेला सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा नवी भरारी घेत सुरू होणार आहे.
ओमकार शुगर ग्रुप पुणेच्या सहकार्याने सातपुडा साखर कारखाना अडचणींवर मात करत पुन्हा एकदा सुरू होत आहे.
या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या अंतर्गत कामे जोरात सुरू झाली आहेत.नोव्हेंबर महिना अखेरीस कारखाना सुरू होईल.तत्पूर्वी शेतकरी बांधवांचे थकीत पेमेंट कारखाना प्रशासनाने थेट सभासदांच्या खात्यात जमा केले आहे. सातपुडा कारखान्याच्या कामगारांचा महिन्याचा पगारही खात्यात जमा करण्यात आला असून व्यापाऱ्यांसह अन्य मदत करणा-या सहकाऱ्यांचे उर्वरित पेमेंटही लवकरच अदा करण्यात येणार आहे.
सातपुड्याचे अध्यक्ष तथा परिसराचे नेते माननीय बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासाचा रथ जोराने पुढे जाणार आहे. लवकरच लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीची चाके सुरू करण्यासाठी व थकीत पेमेंट अदा करण्यासाठी माननीय . बापूसाहेब दीपकभाई पाटील व कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत.
लाला चव्हाण,शहादा तालुका प्रतिनिधी