श्री सिद्धेश्वर विद्यालयात गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री सिद्धेश्वर विद्यालय त गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर गांधीजींचे तत्व गांधीजींनी जी शिकवण व स्वच्छतेचे महत्व त्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर शाळेच्या उपशिक्षिका एम सी कासार यांनी गांधीजी व शास्त्रीजीच्या जीवनाच्या परिचय करून दिला व त्यांची शिकवण विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या संपूर्ण परिसर स्वच्छ केला वरील कार्यक्रमास शाळेचे उपशिक्षक ए बी पाटील, एस के पाटील पी एन पाटील, ए सी ढोले, आर एस कासार, पी व्ही बोरसे, जी व्ही पाटील, पि यू नेरकर, आर एस जाधव, ए एम भिल, आर के मराठे इत्यादी उपस्थित होते.
प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार