स्थानिक गुन्हे शाखेची 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई!!! एकुण 08 लाख 18 हजार 355 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..!

नंदुरबारआ
“आगामी विधानसभा निवडणूक व सण उत्सावाचे अनुषंगाने जिल्हयात व जिल्हयाबाहेर अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणे” बाबत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
त्याअन्वये दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना बातमी मिळाली की, शिरपूर कडून शहादा कडे एक इसम पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनात अवैधरित्या देशी विदेशी दारुची चोरटी वाहतूक करीत आहे.
अशी माहीती मिळाली, त्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनि- मुकेश पवार, रमेश साळुंखे, विकास कापुरे, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख, विजय ढिवरे, आनंदा मराठे, यशोदीप ओगले यांचे एक पथक तयार केले.तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि संदीप आराक, पोउपनि किरण बाडे, पोउपनि- वेडू जाधव,जितेंद्र ईशी, सुरतसिंग राजपूत यांचे मदतीने बातमीची खात्री करुन कारवाई करणे कामी तात्काळ रवाना केले.
मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने पोलीस स्टाफ शिरपुरकडून शहादा कडे येणा-या कुकावल फाट्यावर नाकाबंदी करीत असतांना त्यांना एक चारचाकी वाहन हे संशयितरित्या येतांना दिसले.
सदर वाहनास हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता तो भरधाव वेगाने शहादाकडे पळून गेला, त्याचा पोलीस पथकांनी पाठलाग केला परंतु तो वेगात असल्याने पुढे निघुन गेला, त्यानंतर सदर चारचाकी वाहन हे शिरपूर शहादा रोडाचे एका साईडला खड्डयात गेलेले असल्याचे दिसले. सदर वाहनावरील चालक हा रात्रीचे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. त्याठिकाणी असलेले वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी विदेशी दारुचा वाहनासह एकुण 07,10,240/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
त्याच प्रमाणे दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे पो.निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना बातमी मिळाली की, नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत नगरपालिका चौकाकडून हाट दरवाजा कडे एक इसम बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारु स्वतःचे कब्जात बाळगून तिची चोरटी विक्री करण्याचे इरादयाने दुचाकीवर वाहतुक करणार आहे.या बाबत माहीती मिळाली, त्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पो.उपनि मुकेश पवार, राकेश मोरे,अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करणे कामी तात्काळ रवाना केले.
मिळालेल्या बातमीच्या आधारे शहरातील हाट दरवाजा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नगरपालिका चौकाकडून एक इसम दुचाकी वाहनावर पाठीवर बंग व समोर एक मोठी बंग ठेऊन संशयितरित्या येतांना दिसल्याने त्यास थांबवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विजय गागनदास राजपाल, रा.जुनी सिधी कॉलनी, नंदुरबार असे कळविले.
त्यासोबत असलेल्या बॅगेत काय असलेबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याचे कब्जातील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये देशी विदेशी दारुचा एकूण 1,08,115/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कारवाई करणाऱ्या पोलीस पथकांचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संजय महाजन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा उपविभाग दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.
प्रविण चव्हाण परिवर्तन 24 न्युज नंदुरबार