टक्केवारी भोवली…! बिल अदा करण्यासाठी दोन लाखाची लाचेची मागणी करणाऱ्या गट शिक्षणाधिकाऱ्यावर ईसीबीची कारवाई

धुळे
जिल्ह्यातील साक्री येथील महेंद्र गोपाळराव सोनवणे, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, साक्री जि. धुळे तथा अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक व माध्यमिक)यांनी तक्रारदार यांच्याकडून 2,00,000/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यांचे ओम साई इंटरप्राईजेस या नावाने पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे येथे दुकान आहे. सदर फर्म मार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे पुरवठा करणे बाबत जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साखरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकूण 40,00,000/- रुपयांच्या बूट व पायमोजे या वस्तू पुरवठा केल्या होत्या.
सदर अनुदान मागणीच्या फाईल जमा करून सदर वस्तूंचे बिल अदा करणेकामी लोकसेवक महेंद्र गोपाळराव सोनवणे गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती साक्री जि. धुळे तथा अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक ( प्राथमिक व माध्यमिक), धुळे यांनी बूट व पायमोजे या वस्तूंच्या बिल मागणीचे फाईल जमा करून अंदाजे एकूण 40,00,000/- रुपये बिलाच्या 05 टक्क्या प्रमाणे 2,00,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दिनांक 30/09/2024 रोजी तक्रार केली होती.
सदर तक्रारीची दिनांक 30/09/2024 रोजी व दिनांक 01/10/2024 रोजी पडताळणी केली असता गटशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांनी तक्रारदार यांच्याकडे बूट व पायमोजे या वस्तूंचे अंदाजे एकूण 44,00,000/- रुपये बिलाच्या 05 टक्क्या प्रमाणे 2,00,000/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 व 7(अ) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
χ
सदरचे कारवाईला असलोचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे,संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला,प्रशांत बागुल, मकरंद पाटील,प्रवीण पाटील, सुधीर मोरे,जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्ह्याच्या पुढील तपास सुरु आहे.
याआधी कमिशनखोरीच्या लालुचपायी तत्कालीन सौ गिरी यांच्यावरही लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाने कारवाई केलेली आहे.