तळोदा येथून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जनजाती गौरव यात्रेला सुरूवात
5 ऑक्टोबरला होणार समारोप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जनजाती गौरव यात्रेची सुरुवात तळोदा शहरातील न्यू हायस्कूल या विद्यालयात आप की जय परिवाराचे प्रमुख श्री जितेंद्र महाराज पाडवी, अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. गिरीष पवार, प्रदेश मंत्री कु. वैभवी ढिवरे, जिल्हा प्रमुख प्रा. दिनेश खरात यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
अभाविप ने धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या स्वातंत्र्य लढ्यात असंख्य क्रांतिकारक व नागरिकांनी बलिदान दिले यामध्ये जनजाती योद्धांचा देखील मोठा सहभाग होता. याच इतिहासाची आठवण करून देणारी ही जनजाती गौरव यात्रा आपल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ०१ ऑक्टोंबर ते ०५ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
ही यात्रा जिल्ह्याभरात ६० पेक्षा अधिक महाविद्यालयात, तसेच ०१ लक्ष पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही यात्रा मार्गातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात सुद्धा जाणार आहे. ही जनजाती गौरव यात्रा ज्या ज्या गावांमध्ये जाईल त्या ठिकाणच्या स्थानिक आदिवासी समाजाकडून या यात्रेचे जल्लोषात स्वागत देखील होणार आहे. ह्याच जनजाती गौरव यात्रेचे उद्घाटन तळोदा येथील न्यू हायस्कूल या महाविद्यालयात सकाळी १० वाजता झाले. उद्घाटन नंतर तळोदा शहरांमध्ये ही यात्रा भ्रमण करून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
आज दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तळोदा, सोमावल, मोदलपाडा, रामपूर, सोरापाडा, अक्कलकुवा, डाब, मोलगी येथे मार्गस्थ होणार आहे व पुढे 2 ऑक्टोबर रोजी सुरवाणी, धडगाव, काकरदा ,अमोदा , म्हसावद, पिपरी, लोणखेडा, शहादा, कोथळी, वादळी, बामखेडा, तऱ्हाडी, वारूळ, विखरण, अर्थे, वाघाडी येथे जाणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपूर ,नरडाणा, सोनगीर, नगावे, धुळे शहर, मोराणे, खेडे, कुसुंबा, अकलाड, नेर, अक्कलपाडा येथे जाणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी साक्री, अष्टाने, घोडदे, किरवाडे, दहिवेल, माळणगाव, पानबारा, खानापूर, विसरवाडी, नवापूर,चिंचपाडा, निंबोणी, खांडबारा येथे जाणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी ह्या जनजाती गौरव यात्रेचे समारोप नंदुरबार येथील नामांकित महाविद्यालय डी. आर. हायस्कूल या ठिकाणी होणार आहे.