नंदुरबार ते वाकाचार रस्ता दरम्यान हॉटेलवर पोलिसांचा छापा! मालकावर गुन्हा दाखल,तीन पीडित महिलांची सुटका

Ψūनंदुरबार ते वाकाचार रस्ता दरम्यान एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकुन हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित तिघे महिलांची सुटका करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नंदुरबार ते वाकाचार रस्ता दरम्यान हॉटेल हायवेवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलमनुसार कारवाई करण्यात आली.
गुजरात,पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा परराज्यातील तीन महिलांची पोलिसांनी सुटका केली.
दिनांक 18/10/2924 रोजी हॉटेल हायवे मालक व चालक संजय ब्रिजलाल चौधरी महिलांची तीन पुरुष गिऱ्हाईक यांच्याकडून पैसे स्विकारून त्यांना पीडित महिलांसोबत शारीरिक संबंध करायला लावुन स्वतःच्या मालकीच्या जागेचा वेश्या व्यवसायकरिता वापर करुन त्या महिलांच्या वेश्या व्यवसायावर उदरनिर्वाह करतांना मिळून आल्यामुळे सहाय्यक फौजदार राजेंद्र शंकर दाभाडे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक संजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7 (2) (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ करीत आहेत.