वसुबारस निमित्ताने रांझणी गोशाळेत विहिंप व बजरंग दलच्या वतीने गोपूजन

तळोदा
तालुक्यातील रांझणी येथील गोशाळेत वसुबारसला विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तळोदा यांच्यावतीने गोपूजन करण्यात आले.
वसुबारस दर सालाबादा प्रमाणे विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड तळोदे,यांनी प्रखंड तळोदे तर्फे रांझणी येथे गोशाळेला भेट देऊन वि ही प पदाधिकारिंनी गो पूजन केले व गो मातेला गूळ आणि चण्याची डाळ प्रसादाच्या रूपात देण्यात आला.प्रखंड मंत्री हृषीकेश बारगळ यांनी सांगितले की,याच वर्षी महाराष्ट्रा सरकारने गायीला गो राज्य मातेचा दर्जा दिल्यामुळे सर्व हिंदूंना याचा आनंद झाला.गोमातेच्या संगोपणाठी लागणाऱ्या कुठल्याही खर्चास मदत करायला विश्व हिंदू परिषद प्रखंड तत्पर आहे.
धनंजय मराठे आणि त्यांचे बंधू दहा वर्षा पासुन गो सेवा आणि संगोपन करत आहे. २०१९ चा महाराष्ट्र सरकारचा पशुगणनेचा अहवाल आला त्यात देशी गायीची संख्या फक्त ४६ लाख राहिली यांची चिंता केली. आणि सर्व हिंदू लोकांना गोमाता पालन करण्याचा आव्हान केले.पवन शेलकर आणि भूपेंद्र बारी यांनी गौ पूजन केले. प्रखंडातील पदाधिकारी उपास्थित होते.
जिल्हा सदस्य दिपक चौधरी, प्रखंड मंत्री हृषीकेश बारगळ, पवन शेलकर शहर मंत्री, प्रखंड सत्संग प्रमुख भुपेंद्र बारी आणि गो सेवा संचालक धनंजय मराठे आणि तेथील गो सेवक उपस्थित होते.