नंदुरबार

मतदान करतांना सोशल मीडियावर व्हिडीओ केला व्हायरल!नंदुरबार शहरात एका विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या वेळी मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही किंवा मोबाईल नेलाच तर बाहेर ठेवावा लागला. मोबाईलजवळ ठेवून मतदान केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार असे स्पष्ट प्रशासनाने प्रसिद्ध केले होते.

मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी,मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या अंतरावर ठेवावा लागला.

परंतु काही अपवाद असतात त्याचप्रमाणे काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी नंदुरबार येथे एकाने मतदान केल्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशनजवळील मतदान केंद्र क्र.288,रेल्वे अभियांत्रिकी सभागृह,उत्तर दक्षिण इमारत,दक्षिणेकडील खोली क्र.01 मध्ये काल मतदानाच्या दिवशी अज्ञात मतदार आरोपी याने सकाळी 07 ते दुपारी 12 वाजेदरम्यान त्याठिकाणी स्वतः मतदान करतांना चित्रफीत तयार करुन प्रसारित करुन भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 चे कलम 128 चा भंग केला म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button