तळोदा तालुक्यातील धनपुर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद संपन्न

तळोदा
तालुक्यातील प्रतापपूर केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनपूर येथे धनपूर , सावरपाडा, विहिरीमाळ, घोडमाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रतापपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती रंजना निकुंभे होत्या .तसेच प्रमुख पाहुणे सरपंच श्यामसिंग पाडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय डुलकुल धनपूर, लखन मोरे सावरपाडा , मुख्याध्यापक ,शिक्षकवृंद हजर होते.
शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मुलींनी स्वागत गीत सादर केले .सहभागी मुलींना मान्यवरांनी बक्षीस देऊन गौरविले व त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.मागील मासिक शिक्षण परिषदेतील मागोवा श्रीमती रंजना निकुंभे यांनी घेतला. निपुण सुधारित लक्ष नियोजन याबाबत भिमसिंग वळवी यांनी माहिती दिली.
माझा वर्ग माझे नियोजन विषयावर सतीश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती गटकार्य माहिती व प्रात्यक्षिक सीमा बागुल व मनीषा ठाकूर यांनी गटनिहाय चर्चा घडवून आणली.अध्ययन निष्पत्ती घटकाचे सादरीकरण बाबत दिनेश सोनवणे व प्रवीण गोसावी यांनी चर्चा घडवून आणली.
शेवटी शिक्षण परिषद विषयक शंका व प्रश्न निरसन नवसाक्षरांची माहिती ,शापोआहार, परसबाग, अपार आयडी, गुणवत्ता विकास,प्रशासकीय सूचना केंद्रप्रमुख निकुंभे यांनी दिल्या.
या शिक्षण परिषदेतील प्रास्ताविक नंदकुमार शेंद्रे यांनी तर उपस्थितांचे आभार कालुसिंग पाडवी यांनी मानले शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी भरतसिंग वसावे, उज्वला गायकवाड,राजेंद्र वसावे,सुनिता शिरसाठ,गिंबा राहसे, रवींद्र पावरा, देवमन पवार यांनी परिश्रम घेतले.