अध्यापक शिक्षण मंडळ प्रतिनिधींच्या निवडीबाबत महत्त्वाचा निर्णय

तळोदा : अध्यापक शिक्षण मंडळ संचलित आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज ट्रस्टच्या कार्यकारिणी मंडळाची सभा दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी सेमिनार हॉलमध्ये पार पडली. या सभेत महत्त्वाच्या ठरावांवर चर्चा झाली.
संस्थेच्या नियमानुसार अध्यापक शिक्षण मंडळ, धुळे येथून दोन प्रतिनिधी घेण्याची तरतूद आहे. यासाठी संस्थेने 27 जुलै 2024 रोजी मंडळाच्या अध्यक्षांना पत्र पाठविले होते. त्यानुसार मंडळाने 2 डिसेंबर 2024 रोजी दोन प्रतिनिधींची नावे पाठवली. त्यामध्ये सौ. मंगलाताई अरुणकुमार महाजन आणि रमेश वेडू सूर्यवंशी यांची नावे प्रस्तावित केली होती.
सदर नावे कार्यकारिणी मंडळाच्या सभेत सादर करण्यात आली व त्यावर सखोल चर्चा करून सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई बबनराव माळी, उपाध्यक्ष रोहित भरत माळी, कोषाध्यक्ष आप्पासाहेब बबनराव माळी, सहकार्यवाह अरविंद हिरालाल माळी, तसेच ट्रस्टचे इतर सदस्य आणि प्राचार्य डॉ. हेमंत सुधाकर दलाल कार्यवाह अरविंद माळी. कॉलेज ट्रस्टचे सदस्य उखा पिंपरे, अनिल माळी, दत्तात्रय पाटील, सुनील कर्णकार, नंदूगिर गोसावी, विलास सूर्यवंशी, मुकेशचंद्र कलाल, चेतन पवार या सर्वांच्या उपस्थितीत सदर ठराव मंजूर करण्यात आला.