अवैध दारू बाळगणा-यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई! एकुण 03 लाख 64 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

लाला चव्हाण
वडाळी -:(प्रतिनिधी )स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दि. 27 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील साव-या दिगर गावात इसम नामे इलापसिंग पावरा हा बेकायदेशीर विदेशी दारु व बियर विक्री करण्याचे उददेशाने त्याचे घराचे बाजुस असलेल्या झोपडीत बाळगुन असल्याची खात्रीशिर माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे म्हसावद पोलीस ठाणे यांचे मदतीने साव-या दिगर गावी आले. तेथे थोड्या अंतरावर थांबुन मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे पुढे इलापसिंग पावरा याचे घराजवळ गेले असता सदर इसम इलापसिंग पावरा पोलीसांना पाहून मागील दरवाजाने पळून गेला, त्याचे घराचे ठिकाणी पोलीसांनी तपासणी करता तेथे विदेशी दारु व बियरचा एकुण 3,64,320/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे पथकास यश मिळाले आहे.
त्याअन्वये इसम नामे ईलापसिंग तेलसिंग पावरा, रा. साव-या लेखडा ता.धडगाव जि. नंदुरबार याचे विरुध्द म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 278/2024 महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार,राकेश बसावे, मनोज नाईक, विशाल नागरे, अविनाश चव्हाण, मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोकों विजय ढिवरे आदीनी केली आहे.