भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांना बडतर्फ करा!आंबेडकर समाजाची मागणी

तळोदा
परभणी जिल्ह्यात संविधान अवमानाची घटना घडली या घटनेच्या निषेध आंदोलनात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला होता. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि त्यात कायद्याचा विद्यार्थी भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला या घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आंबेडकरी समाजाच्या वतीने तळोदा तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यातील संविधान अवमान घटनेच्या निषेधात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांवर बेदम मारहाण केली, असा आरोप आहे. या घटनेत कायद्याचा विद्यार्थी असलेले भीम सैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला.
सोमनाथ सुर्यवंशी हे आंदोलनात सहभागी नसले तरी त्यांना पोलिसांनी मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप आंबेडकर समाजाने केला आहे. तळोदा शहर आणि तळोदा तालुक्याच्या सर्व आंबेडकर समाजाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.आंबेडकर समाजाने प्रकरणाच्या गुन्हेगारी तपासाची मागणी केली आहे. “मारहाण करणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांचा आर्थिक सहाय्य द्यावा,” अशी मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आंबेडकर समाजाने इशारा दिला आहे की, जर त्यांची मागणी मान्य केली नाही तर राज्यभर निषेध आंदोलन व रास्ता रोको सुरू केला जाईल.
निवेदनावर सुरेश सुर्यवंशी,भिकलाल ढोडरे, कन्हैयालाल ढोडरे, संतोष ढोडरे,रवि पगारे,शरद सोनवणे यांच्या सह्या आहेत.