घरकुल मंजूर लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू उपलब्ध होणेसाठी उपाययोजना करा! माकपची मागणी; तहसीलदार यांना निवेदन

तळोदा
तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना नमुद वेळेत घर बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नसल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वाळू उपलब्ध होणेकामी तळोदा तहसीलदार दिपक धिवरे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,सध्या प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेली असून शासकीय धोरणानुसार अल्प कालावधीत घरकुले पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र तापी नदी मधून वाळू वाहतूक करणारी
र्य आहे. मात्र तापी नदीमधून वाळू वाहतुक करणारी वाहने आपल्या स्तरावरुन बंद करण्याची माहिती प्राप्त झाली आहे. आपण आपल्या नियमानुसार कारवाई करण्यात आम्हास कोणतीही अडचण नाही आहे. परंतु एक घरकुल बांधण्यास तेवढी वाळू लागते तेवढी व्यवस्था तालुक्यातील एकुण मंजूर घरकुल संख्येवरुन करण्यात यावी. नाहीतर कोणत्याच लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम करता येणार नाही.घरकुल योजना या सर्व शासनाच्याच योजना असल्याने आपल्या स्तरावरून सदर योजनेच्या कामासाठी अडथळा निर्माण होऊ नये अशी नम्र विनंती आम्ही या निवेदनाव्दारे आपणास करीत आहोत. जर घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळाली नाहीतर भारताचा कम्युनिस्ट ( मार्क्सवादी )पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येईल.
असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर माकपचे तालुका सचिव अनिल ठाकरे,जिल्हा कमिटी सदस्य रुबाबसिंग ठाकरे,सदस्य सुदाम ठाकरे,तालुका सदस्य सुभाष ठाकरे,कैलास चव्हाण,मनोहर साळवे,रमण पवार,नवनाथ ठाकरे,संजय पवार,सिद्धार्थ महिरे, रमेश नाईक आदींच्या सह्या आहेत व निवेदनदेतेवेळी उपस्थित होते.