चोरीस गेलेल्या 19 मोटारसायकली स्थानिक गुन्हे शाखेकडून हस्तगत! नंदुरबार, तळोदा,विसरवाडी, नवापुर व जिल्ह्याबाहेरील मोटारसायकली

नंदुरबार
तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी दिलीप कोकणी, रा.कळंबा ता.जि. नंदुरबार यांची मोटर सायकल ही चोरी झाले बाबतची फिर्याद वरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुध्द भा.न्या.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखा पो. निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, विसरवाडी हद्दीतील बिजादेवी गावातील राकेश कोकणी, शशिकांत कोकणी व त्याचे साथीदार यांनी वर नमुद गुन्हयातील मोटारसायकली चोरी केली आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पो. नि. हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीनुसार विसरवाडी हद्दीतील बिज्यादेवी या गावी जावुन संशयित इसमांचा शोध घेतला असता वर नमुद माहितीप्रमाणे संशयित इमस मिळून आले, त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी त्यांचे नाव
राकेश दिलवर कोकणी, (23) रा.बिजादेवी ता. नवापूर जि. नंदुरबार
शशिकांत कौतिक कोकणी, (26) रा. बिजादेवी, ता. नवापूर जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन चोरीचे मोटारसायकलींबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार नामे अरविंद जगदीश कोकणी, (22 ) रा. ता.नवापूर जि. नंदुरबार.
निलेश हसिराम कोकणी, (24) रा ता. नवापूर जि. नंदुरबार अनमोल ऊर्फ दादू विलास गावीत (28) रा.शेगवे, ता. नवापूर जि. नंदुरबार.प्रदीप राजू कोकणी, (26) रा. ता.जि. नंदुरबार.
लखन ऊर्फ लक्ष्मण अशोक वळवी, (फरार) रा. बिजादेवी ता. नवापूर जि. नंदुरबार अशांसह नंदुरबार जिल्हयातील तळोदा, विसरवाडी, नंदुरबार व जिल्हयाबाहेरील देखील काही मोटारसायकली चोरी केले असल्याची कबूली दिली आहे. तसेच सदर मोटारसायकली चोरीच्या असलेबाबत माहिती असतांना देखील त्या कमी किमतीत विकत घेणारा इसम नामे रोहीदास मोतीराम भोई, (22 ) जि. नाशिक यास देखील ताब्यात घेण्यात आले असून एकुण 07 आरोपींना तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहेत.
सदर इसमांनी चोरी केलेल्या एकुण 09,15,000/- रु. किमतीच्या 19 मोटारसायकली हस्तगत करुन नंदुरबार जिल्हयातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, राकेश वसावे, विशाल नागरे, दादाभाई मासूळ, मोहन ढमढेरे, राजेंद्र काटके, यशोदीप ओगले, रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे.
प्रविण चव्हाण, नंदुरबार